ग्रंथसंपदा वाढविणे व संवर्धन करणे ही काळाची गरज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीचे उपक्रम व कार्य हे कौतुकास्पद असून ग्रंथसंपदा वाढविणे व संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढी आयोजित अभियंता भवन व ग्रंथालय बहुद्देशीय जागेचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. 

याप्रसंगी जिल्हा शासकिय अभियंता सहकारी पतपेढी मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड19 साठी 1 लाखाचा धनादेश पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी अभियंता पतपेढीच्या कार्याचे व त्यांचे स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले. तांत्रीक बाबी तपासून अभियंता पतपेढीला जागा देण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत याच्यासह मान्यवरांचा पतपेढीचे चेअरमन साहेबराव पाटील यांच्या हस्ते पुस्तक व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे होते. तर पतपेढीचे चेअरमन साहेबराव पाटील, सा.बा. चे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे , तापी पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी व्हि. डी. पाटील,  कार्यकारी अभियंता एस.सी. अहिरे, उपविभागीय अभियंता डी.जे. निकम यांच्यासह मोठया संख्येने अभियंते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासकिय अभियंता सहकारी पतपेढीचे चेअरमन साहेबराव पाटील यांनी शासकिय अभियंता पतपेढीच्या  सामाजिक कार्याचा व उपक्रमांचा लेखाजोखा मांडला. तापी पाटबंधारे नियामक मंडळाच्या बैठकीत यापूर्वी ठराव करून 2 हजार चौरस फूट जागा पतपेढी उपलब्ध झालेली आहे. मात्र  सदर जागा कमी पडत असल्याने 10 हजार चौरस फूट जागेची मागणी यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. तर आभार व्हि. डी. पाटील यांनी मानले.

 

Protected Content