बी.एचएमसीटी प्रवेश परिक्षेला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ : हरीभाऊ जावळे इन्स्टीट्युटमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध !

जळगाव प्रतिनिधी | राज्य सामाईक परीक्षा कक्षाने बी.एचएमसीटी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परिक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. गोदावरी फाऊंडेशन संचलीत हरीभाऊ जावळे इन्स्टीट्युट ऑफ हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये या कोर्सला प्रवेश घेता येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, राज्य सामाईक परीक्षा कक्षाने एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून बी.एचएमसीटी अर्थात बॅचलर इन हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणार्‍या प्रवेश परिक्षेला अर्ज करण्यासाठी २८ सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्य शासनाच्या डीटीई विभागातर्फे बी.एचएमसीटी या अभ्यासक्रमासाठी ८ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रवेश परीक्षा घेतली जाणार असून यातील गुणानुक्रमानुसार विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. या सीईटी परिक्षेसाठी आधी २० सप्टेंबर ही मुदत वाढवून आता २८ सप्टेंबर इतकी करण्यात आली आहे. आर्टस, सायन्स, कॉमर्स आणि व्होकेशनल अभ्यासक्रम घेऊन बारावी उत्तीर्ण झालेला कोणताही विद्यार्थी या प्रवेश परिक्षेला बसू शकणार आहे. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बॅचलर इन हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार आहे. हा अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर जागतिक पातळीवर काम करण्याची संधी असून हा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आहे.

दरम्यान, जळगाव येथे गोदावरी फाऊंडेशन संचलीत हरीभाऊ जावळे इन्स्टीट्युट ऑफ हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेत बॅचलर इन हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. गोदावरी फाऊंडेशनच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला अनुसरून या संस्थेमध्ये अतिशय दर्जेदार अशा सुविधा उपलब्ध असून याचा कँपस हा प्रशस्त व हवेशीर जागेत आहे. ही संस्था उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था असून यंदापासून येथे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रमाने येथे प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलेले आहे.

या संदर्भात इच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी गोदावरी फाऊंडेशन संचलीत हरीभाऊ जावळे इन्स्टीट्युट ऑफ हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेचे प्राचार्य पुनीत बसोन यांच्याशी- ९८३४८०३१०४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content