अरे बापरे…जिल्ह्यात २१७ तर जळगाव शहरात ९२ नवीन कोरोना बाधीत !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होण्यास तयार नसून आज नवीन २१७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरातील तब्बल ९२ रूग्णांचा समावेश असल्याची माहिती सायंकाळच्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण २१७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ९२ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल पारोळा-२६; चाळीसगाव-१८; रावेर-१५; बोदवड-१५ अशी रूग्णसंख्या आढळून आली आहे.अन्य ठिकाणांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण व चोपडा- प्रत्येकी ११; भुसावळ-६; अमळनेर-१; भडगाव-५; धरणगाव- २; यावल-६; एरंडोल-३; जामनेर-५ आणि अन्य जिल्ह्यातील-१ अशी रूग्णसंख्या आहे.

दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४८०३ इतका झालेला आहे. यातील २८२८ रूग्ण बरे झाले आहेत. यातील ११९६ रूग्ण हे कोविड केअर सेंटरमध्ये; ५६ रूग्ण हे कोविड केअर हॉस्पीटलमध्ये तर जिल्हा कोविड रूग्णालयात ४३० रूग्ण उपचार घेत आहेत. आज ११ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या २९३ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

जळगाव शहरातील कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आजपासून लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे. याचे आज पहिल्याच दिवशी चांगल्या प्रकारे पालन देखील करण्यात आले आहे. तथापि, जळगावात मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून येत असल्याचे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे. तर, आजपासूनच भुसावळ व अमळनेर शहरात देखील लॉकडाऊन घोषीत करण्यात आलेला आहे. आजच्या रिपोर्टमध्ये या दोन्ही शहरांमधील संसर्ग हा आटोक्यात असल्याचे दिसून आले असले तरी हेच चित्र भविष्यात कायम राहणार का? हा खरा प्रश्‍न आहे.

Protected Content