स्त्री- पुरुष समानतेवर मंथन होणे काळाची गरज- भाग्यश्री नवटके

navtake news

जळगाव प्रतिनिधी । समाजात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वाईट घटनांमुळे संबंधित घटक पोखरला जात आहे. स्त्री पुरुष समानतेवर केवळ चर्चा न करता त्यावर प्रत्येकाने मंथन करणे ही काळाची गरज असून यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल असे विचार आपल्या बीज भाषणातून अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी मू. जे महाविद्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदेविषयक कार्य शाळेत मांडले.

के.सी.ई.सोसायटी संचालित मू.जे.महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय महिला आयोग दिल्ली प्रायोजित महिला कायदेविषयी जाणीव जागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, उपप्राचार्य एस.एन.भारंबे, के.सी.ई. व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या तथा नाहटा कॉलेजच्या प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांचे स्वागत तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. समाजशास्त्र विभागातर्फे मान्यवरांच्या हस्ते “महिला कायदविषयक” या आशयाचे पुस्तककचेही प्रकाशन करण्यात आले. पुढे बोलतांना त्या म्हटल्या कीं, महिलांविषयीच्या जाणीव जागृती कार्यक्रमात पुरुष व महिला या दोघांचा समावेश होणे अधिक महत्वाचे आहे. हा विषय केवळ महिलांकरता नसून मर्यादित नाही हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.

Protected Content