जळगाव, प्रतिनिधी । शिवाजीनगर पटेल वाडी येथील रस्ता दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवाजीनगर शिवसेना विभागप्रमुख विजय बांदल यांनी निवेदनाद्वारे आयुक्त सतीश कुलकर्णी यांना केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, गणेशोत्सव आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि शिवाजीनगर पटेल वाडी भागात गणेश मूर्ती बनविण्याचे कारखाने बऱ्याच प्रमाणात आहेत. येथील मूर्तिकारांना आपल्या गणेश मूर्ती त्यांच्या कारखान्यातून बाहेरगावी विक्रीसाठी नेण्याकरता वाहनातून घेऊन जावे लागतात. या परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. ठिक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तर पावसामुळे सर्वत्र रस्त्यावर चिखल पसरलेला आहे, अशा रस्त्यातून या मूर्तिकारांना आपली वाहने नेण्या आणण्यास खूपच त्रासदायक होत आहे .त्यात गणेश मूर्तींची तुटफुट होत आहे. अनेक गणेश भक्त आणि ठिक ठिकाणांहून गणेश मंडळांचे कार्यकर्ते सुद्धा गणेश मुर्ती घेण्याकरता या कारखान्यांवर येत असतात. अशावेळी त्यांना रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेतेमुळे गणेश मूर्ती नेण्यास खूप त्रासदायक परिस्थिती निर्माण होते. त्यात जर गणेशमूर्तींची तुटफुटत झाली तर गणेश भक्तांच्या धार्मिक भावना ही दुखावतात. अगोदर या रस्त्यासाठी निवेदन दिलेली आहे या परिसरातील राहणा-या नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. तरी शिवाजी नगर पटेल वाडी येथील नागला किराणा ते राजू पाटील यांच्या गणपती कारखान्यापर्यंत असलेला रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी शिवसेना कार्यालय प्रमुख संजय सांगळे. समाज सेवक गणेश मोझर, उपजिल्हाप्रमुख छावा संघटनेचे किरण ठाकूर, मधुकर साबळे आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4280873565336500