नासाचे पर्सिव्हियरन्स रोव्हर मंगळावर उतरले

 

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था । मंगळावर जीवसृष्टी  अस्तित्व शोधण्यासाठी अमेरिकेतील अंतराळ संस्था ‘नासा’ने  महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. १८ फेब्रवारी रोजी पहाटे २.३० वाजता नासाच्या पर्सिव्हियरन्स रोव्हरचं मंगळावर यशस्वी लँडिंग करण्यात आलं. जेजेरो क्रेटर  या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं

 

मंगळावरील जीवसृष्टीच्या पाऊलखूणा शोधण्यासाठी पृथ्वीवरून पाठवण्यात आलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरनं यशस्वीपणे पाऊल टाकलं. नासाने सात महिन्यांपूर्वी मंगळावर पर्सिव्हियरन्स रोव्हर पाठवला होता. १८ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजता रोव्हरचं यशस्वीपणे लँडिंग करण्यात आलं. या रोव्हरच्या लँडिंगबरोबरच अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे.

 

 

नासाने मंगळावर पाठवलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरने  उतरताच पहिलं छायाचित्र पाठवलं  आहे. जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी हे रोव्हर मंगळावरील माती आणि दगडांचे नमुने घेऊन येईल.

 

Protected Content