जळगाव प्रतिनिधी । शहरातील स्वातंत्र्य चौकातील इंडिया गॅरेजजवळ आज बुधवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोठे झाड कोसळल्याने पार्किंगला उभ्या असलेले दोन चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या पथकाने तातडीने धाव घेत पडलेले झाड बाजूला केले. यात कोणालाही दुखापत झालेली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील स्वातंत्र्य चौकात असलेले इंडिया गॅरेजजवळ एस बँक आहे. येथील एस बँकेचे डेप्यूटी मॅनेजर देवेंद्र उगले यांनी (एमएच १५ जीए ६१८८ ) यांची कार पार्किंग करून लावली होती. त्यांच्या कारच्या बाजूला (एमएच १९ एपी ४५१९) क्रमांकाची कार देखील पार्किंगला उभी होती. दोन्ही कार जवळ असलेले गुलमोहरेचे भले मोठे झाड आज बुधवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पावसामुळे कोसळल्याने पार्किंगला लावलेल्या कारांवर झाड पडले. यात एस बँकेचे डेप्यूटी मॅनेजर देवेंद्र उगले यांनी (एमएच १५ जीए ६१८८ ) यांची कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर (एमएच १९ एपी ४५१९) या कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. झाड कोसळल्याची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक आणि महावितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुरूवातीला विद्यूत प्रवाह बंद करण्यात आला नंतर झाड बाजूला करून कापण्यात आले. याप्रकरणी झाड कोसळल्याने कोणतीही शासकीय नोंद करण्यात आलेली नव्हती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/537146987577259