प्रेमलता पाटील यांना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील जळगाव खुर्द उपकेंद्रात कार्यरत आरोग्यसेविका प्रेमलता संजय पाटील यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते व्हर्च्युअल पध्दतीत राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नशिराबाद आरोग्य केंद्रांतर्गत जळगाव खुर्द उपकेंद्रात कार्यरत आरोग्यसेविका प्रेमलता संजय पाटील यांची राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जानेवारीच्या प्रारंभी याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर  प्रेमलता पाटील यांना आज झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती यांच्या हस्ते व्हर्च्युअल पध्दतीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रेमलता पाटील यांनी २००६ ते २०१३ पर्यंत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आदिवासी भागात पाड्यांवर सेवा दिली. या काळात त्यांनी लसीकरण, माता बालसंगोपन आदी विविध राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले. बालकांच्या पोषणाबाबत विशेष दक्षता घेतली. त्यानंतर त्यांनी रावेर तालुक्यातील चिनावल येथे सहा वर्षे सेवा दिली. त्यानंतर त्या वर्षभरापूर्वी जळगाव खुर्द येथे रुजू झाल्या होत्या. त्यांच्या १४ वर्षांच्या सेवेची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. आज हाच पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

 

Protected Content