कर्ज घोटाळयाप्रकरणी प्रसिद्ध उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना अटक

ratnakar gutte

 

परभणी (वृत्तसंस्था) गंगाखेड येथील प्रसिद्ध उद्योजक, ‘गंगाखेड शुगर्स’चे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी २२ बोगस कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून २६ हजार शेतकऱ्यांना व बँकांना सुमारे ३०० कोटी रुपयांना फसवल्या प्रकरणी आज दुपारी गुट्टे यांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली आहे. दरम्यान, रत्नाकर गुट्टे हा महाराष्ट्रातील छोटा नीरव मोदी असल्याचा आरोप करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुट्टेंवर कारवाई करण्याची मागणी विधीमंडळात केली होती.

 

गंगाखेड शुगर लिमिटेड माकणीचे प्रमोटर रत्नाकर गुट्टेंनी यांनी 2014 पासून 2017 पर्यंत सुमारे 29 हजार शेतकऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रं तयार करुन पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एका खाजगी बँकांतून 359 कोटींच कर्ज उचलल्याच आरोप आहे. सीबीआय औरंगाबाद पथकाने आज गंगाखेड कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळल्याने त्यांची परभणीच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात 7 शेतकऱ्यांनी एकत्रित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ज्यावर न्यायालयाने दिलेल्या चौकशी आदेशनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 29 हजार शेतकऱ्यांच्या नावावर रत्नाकर गुट्टे यांनी परस्पर 359 कोटींचं कर्ज उचले होते. रत्नाकर गुट्टे यांच्यावर 5 जुलै 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वर्षानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. 28 फेब्रुवारीला गंगाखेड शुगर्स कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग पडवळ यांना अटक करण्यात आली होती.

 

गंगाखेड तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना कर्जाची गरज पडली. तेव्हा शेतकऱ्यांना सीबील रिपोर्टमध्ये आपल्या नावावर कर्ज असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मयत लोकांच्या नावे कर्ज घेतल्याचेही चौकशीत उघड झाले होते. फसवल्या गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, अकोला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा, तर फसवलेल्या बँकांमध्ये परभणी सिंडीकेट बँक, युको बँकेच्या गंगाखेड, लातूर आणि नांदेडच्या शाखा, बँक आँफ इंडियाची अंबाजोगाई शाखा, आंध्र बँकेची नागपूर शाखा, युनाटेड बँकेची नागपूर शाखा आणि रत्नाकर बँक मुंबई या बँकांचा समावेश आहे.

Add Comment

Protected Content