मराठा आरक्षणासाठी मुलाने जीवन संपवले असे म्हणत जन्मदात्या पित्यानेच पंख्याला लटकवले मृतदेह; मात्र पोलिस तपास सत्य आले समोर

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काही महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आंदोलन करत होते. हे आंदोलन दीर्घकाळ सुरू होते. या आंदोलनादरम्यान काही मराठा तरूणांनी सरकाराकडून आरक्षणाची मागणी मान्य करत नसल्यामुळे आत्महत्याही केल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने आत्महत्या केलेल्या मराठा तरूणांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली होती. या आर्थिक मदतीसाठी एका पित्याने आपल्या पोटच्या मुलाची हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्हयातून उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्हयातील घनसावंगी तालुक्यामधील मुरूम गावात १९ वर्षांच्या महादेव थुटे या तरूणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. परंतू ही आत्महत्या नसून सुनियोजित हत्या आहे, अशी माहिती समोर आली आहे. महादेवची हत्या त्यांच्या वडिलांनी केली असून त्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाची खोटी कहाणी रूचून आत्महत्येचा बनाव करण्यासाठी मुलाचा मृतदेह पंख्याला लटकवून दिला होता. आपण मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे एक चिठ्ठीदेखील महादेवच्या मृतदेहाच्या बाजूला ठेवून दिली. त्यामुळे महादेवने आत्महत्या केली, असा सर्वांचा समज झाला. शिवप्रसाद थुटे असे आरोपीचे नाव आहे. त्यांचा महादेवशी वाद झाला होता. याच वादामुळे जन्मदाता पित्यानेच महादेवची रागाच्या भरात गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी शिवप्रसाद थुटेला अटक केली आहे.

Protected Content