मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही असे स्पष्ट वक्तव्य गुरूवारी ९ मे रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांची बोलताना दिले आहे. पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत समन्वयाने काम करतील किंवा काँग्रेस पक्षात विलीन होतील, असे भाकीत शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले होते.
त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी चर्चा रंगली होती. त्यावर शरद पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काँग्रेस विलीनकरणाच्या चर्चा थंडावल्या आहेत.