खुशखबर : ॲमेझॉन भारतात देणार १० लाख नोकऱ्या

Amazon

नवी दिल्ली वृत्तसंस्था । ई-कॉमर्स कंपनी असलेल्या ॲमेझॉनने शुक्रवारी भारतात गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. पायाभूत सुविधा, टेक्नोलॉजी आणि लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे ॲमेझॉनने जाहीर केले आहे. यातूनच येत्या पाच वर्षांत देशभरात दहा लाख नवीन रोजगार निर्मिती करण्याच्या योजना असल्याची माहिती ॲमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी दिली आहे.

सीईओ जेफ बेझोस यांनी सांगितले की, आमच्या कंपनीच्या येथील व्यवसायात कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे. आमच्याशी जोडल्या गेलेल्या लहान व्यावसायिकांनी असामान्य सृजन दाखवले आहे. तसेच, आमच्या मंचावरून विकल्या जाणाऱ्या उत्पादनांना येथील ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भविष्यात येथे व्यवसायविस्तार करण्याचे उद्दिष्ट कंपनीने आखले असून त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार व देशी व्यावसायिकांना बाजार उपलब्ध होईल, असे बेझोस म्हणाले.

 

Protected Content