हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी घेतली राज ठाकरेंची भेट ; राजकीय चर्चेला उधान

Raj 2

 

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव व भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजनही ‘कृष्णकुंज’वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. या भेटीनंतर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील हर्षवर्धन जाधव यांची एक वेगळी ओळख आहे. जाधव हे मनसेचे माजी आमदार देखील आहेत. जाधव यांनी सासरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही घर फोडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी जाधव यांच्यावर पैशांसाठी पत्नीला मारहाण करत माहेरी पाठवल्याचा गंभीर आरोप केला होता. दुसरीकडे प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांचे ज्येष्ठ बंधू प्रकाश महाजन हे सक्रिय राजकारणात नाहीत. परंतू राज ठाकरे यांनी हिंदुत्व स्वीकारले, तर त्यांच्यासारखा मोठा हिंदुत्ववादी नेता नसेल, ते जी भूमिका घेतील ही स्वागतार्ह असेल, असे वक्तव्य करत महाजनांनी राज ठाकरेंची भेट घेणे भुवया उंचावणारे आहे.

Protected Content