धरण पाहण्यासाठी गेलेल्या तरूणांची कार बुडाली धरणात; जीवीतहानी नाही

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोला जिल्हयामधील अकोट शहरातील धरण पाहण्यासाठी आलेल्या तरूणांची कार धरणात बुडालीची घटना समोर आली. सातपुडा पायथ्याशी असलेल्या पोपटखेड धरणातील हा प्रकार आहे. धरणाच्या आवार भींतींवर कार उभी करुन तरुण धरण पाहण्यासाठी गेले असता, अचानक कार हळूहळू धरणाच्या उताराच्या दिशेने खाली जाऊन पाण्यात बुडाली. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. कारण जेव्हा बुडाली तेव्हा कारमध्ये कोणीही नव्हते.

अकोट शहरातील काही तरुण (एमएच 05-एएस 3730)क्रमांकाची कार घेऊन पोपटखेड धरण पाहण्यासाठी गेले होते. कारमधील तरुण धरण पाहण्यासाठी उतरल्यानंतर आवार भिंतीवर उभी असलेली कार अचानक धरणाकडील किनाऱ्याकडे सरकत गेली, काही वेळातच ही कार पाण्यात पडली. त्यानंतर, कारमधील युवकांनी स्थानिकांकडे मदतीसाठी याचना केली. यावेळी, वीर एकलव्य बचाव पथकानं आपल्या चमूसह धरणात बुडालेली कार ओढून बाहेर काढली. सुदैवाने कारमधील युवक धरण पर्यटन करत असल्याने कारमध्ये नव्हते. या दुर्घटनेत कारचे नुकसान झाले असून कार बाहेर काढल्यानंतर तरुणांनी सुटकेचा निश्वास टाकला. धरणात कार कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

Protected Content