काळभैरव यात्रेत बारागाडया ओढण्याचा कार्यक्रम असल्याने रविवारी भरणार आठवडे बाजार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील शहरातील बु्न्हाणपुर-अंकलेश्र्वर या प्रमुख मार्गावर १० मे शुक्रवार रोजी काळभैरव यात्रा निमित्ताने बारा गाडया ओढण्याचा कार्यक्रम आहे. या दिवशी भरणारे आठवडे बाजार दोन दिवस पुढे ढकलण्यात आले असून १२ मे रोजी भरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेश पत्रकाव्दारे देण्यात आली आहे .
या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या आदेश पत्रकात म्हटले आहे की, यावल शहरातील यावल फैजपुर मार्गा वरील काळ भैरव महाराज यांची यात्रा १० मे रोजी शुक्रवार रोजी साजरी होणा रआहे. या यात्रा निमित्ताने शहरातील जाणाऱ्या बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर या राज्य मार्गावरून बारागाडया ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी यावल शहरात शुक्रवारच्या दिवशी नियमीत भरणारा आठवडे बाजार याच मार्गावर भरवण्यात येत असतो. यावेळी या बाजारात जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी नागरीकांची मोठी गर्दी होते. अशा वेळी यात्रा निमित्ताने ओढल्या जाणाऱ्या बारागाडया बघण्यासाठी मोठी गर्दी होऊन अशा वेळीला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुंबई मार्केट अँण्ड फेअर्स अॅक्ट कलम १८६२ चे कलम ५ ( अ ) व ( क ) अन्वये या संदर्भातील तसे आदेश यावल नगर परिषदला देण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी १० मे रोजी भरणारा आठवडे बाजार हा दोन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. १० मे रोजी भरणारा आठवडे बाजार हा १२ मे रविवार रोजी भरणार असून यावलच्या आठवडे बाजारात विविध ठिकाणाहून भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तु विक्रीसाठी येणारे शेतकरी व व्यापारी आणी जिवनावश्यक वस्तुंची खरेदीसाठी येणाऱ्या तालुक्यातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने सुचविण्यात आले आहे .

Protected Content