यावल शहरासह तालुक्यात महामानवास अभिवादन

WhatsApp Image 2019 04 14 at 21.05.54

यावल प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १२८ वी जयंती यावल सह तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावल शहरात १४ रोजी सकाळी १० वाजेला प्रथम शहरातील बुरुज चौकात मान्यवराचा हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले यानंतर रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या समितीच्या वतीने सजवलेल्या वाहनात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. श्रीराम नगर, पंचशील नगर व बोरावल गेट या भागातील कार्यकर्तेनी सजवलेल्या वाहनात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ठिकाणाहुन शहरात सवाद्य भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसिलदार जितेंद्र कुवर , पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष सुरेखा कोळी, माजी नगराध्यक्ष शंशांक देशपांडे, भुसावळ माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हा परिषदचे सदस्य व कॉग्रेस तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख शरद कोळी , माजी नगराध्यक्ष तथा विद्यामान नगरसेवक दिपक बेहेडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व उपनगराध्यक्ष मुकेश येवले, शिवसेना शहर प्रमुख जगदिश कवडिवाले , कॉग्रेस शहर अध्यक्ष कदीर खान, मनसे शहर अध्यक्ष चेतन आढळकर, पुंडलिक बारी, अनिल जंजाळे, विष्णु पारधे, अरूण गजरे, विजय गजरे , दिलीप वाणी , मनोज करणकर, महिला उत्सव समितीच्या अध्यक्षा सुरेखा पारधे, उपअध्यक्ष गौतमाबाई गजरे, रेखाबाई बिऱ्हाडे, कविता जाधव , कमलाबाई पारधे, सुमनबाई गजरे यांच्या सह शहरातील सर्वपक्षिय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्य, शासकीय अधिकारी ,कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित राहुन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी उत्सव समिती सदस्य व समाज बांधवांनी परिश्रम घेतले. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १२८ व्वी जयंती निर्मित्त शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे भुसावळ टि-पॉईन्ठ वर, यावल बसस्थानक या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन झाले.

यावल तहसिल कार्यालयात देखील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे प्रतिमा पुजन तहसिलदार जितेंद्र कुवर यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी नायब तहसीलदार आर के पवार, सरकल ई व्ही महाडीक, जी ई पाटील, निखील मिसाळ, तलाठी शरद सुर्यवंशी आदींची उपस्थिती होते व यावल पोलिस स्टेशन मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे प्रतिमा पुजन पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत स.पो.नि. सुनिता कोळपकर यांच्यासह पोलिस व होमगार्ड आदींची उपस्थिती होते.

शहरातील शासकीय कार्यालय, महाविद्यालय, व शाळेत ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. अश्या प्रकारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीचा मोठा उत्साह दिसुन आला. यावेळी उत्साह दरम्यान पोलीस प्रशासनातर्फ यावल शहरा सह तालुक्यात पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणा पोलिस व होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Add Comment

Protected Content