धावत्या रिक्षेत चालक व सहप्रवाशाने केला तरूणीचा विनयभंगचा प्रयत्न; भीतीमुळे रिक्षेतूनच घेतली उडी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईमध्ये धावत्या रिक्षांमध्ये तरूणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तिने रस्त्यावर उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बोरिवली पश्चिम भागात घडली आहे. तरूणी रिक्षेत बसली असता तिचा रिक्षा चालक आणि शेजारी बसलेल्या सह प्रवाशांने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. भीतीमुळे तीने धावत्या रिक्षेतून उडी मारूली यात ती किरकोळ जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, पश्चिम बोरीवलीतील पोईसर येथून रेल्वे स्टेशन जाण्यासाठी पीडित तरूणी ८ मे रोजी सकाळी बुधवारी रिक्षामध्ये बसली होती. या रिक्षामध्ये आधीच एक प्रवासी बसला होता. त्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने आणि चालकाने रिक्षा सुरू होताच तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला दोघांच्या प्रकाराकडे तरुणीने दुर्लक्ष केले. मात्र, त्यांचे चाळे थांबत नसल्याने तिने रिक्षाचालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले. रिक्षा चालकाने तरुणीच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. रिक्षा चालक रिक्षा थांबवत नसल्याचे पाहून तरुणीने धावत्या रिक्षामधून उडी मारली. या घटनेत पीडित तरुणी किरकोळ जखमी झाली.
या घटनेची बोरिवली पोलिसांनी तत्परतेने दखल घेत आरोपी रिक्षा चालक आणि छेड काढणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. . धीरज तिवारी (वय 40 वर्ष) आणि संजीव छतुराम (वय 32 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे दोन्ही आरोपी मुंबईत रिक्षा चालवतात. पोलिस पुढील तपास करत आहे.

Protected Content