चाळीसगाव शहरात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरूच!

 

चाळीसगाव:‌ प्रतिनिधी । जी. के. पतपेढी कर्जाचे फार्म घेण्यास गेलेल्या व्यक्तीचे शहरातील गायत्री कॉम्प्लेक्स येथील बालाजी नास्ता समोर लावलेली दुचाकी लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली  शहर पोलिस ठाण्यात  फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

विरेंद्र भास्करराव वाघ ( ५१ रा. विद्युत सरीता कॉलणी, मालेगाव रोड) चाळीसगाव येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून राष्ट्रीय विद्यालय दहिवद येथे मुख्याध्यापक म्हणून नौकरीस आहे. जळगाव येथील मित्र अमोल सुभाष पवार यांनी नोव्हेंबर-२०२० मध्ये सुझुकी कंपनीची पांढर्या रंगाची मोटारसायकल (क्र. एम एच – १९ – डी एस – ०३६७) विकत घेतली होती.  ती तीन महिन्यांपासून विरेंद्र वाघ हे वापरत आहेत. २० फेब्रुवारी रोजी सकाळी जी. के. पतपेढी कर्जाचे फार्म घेण्यासाठी विरेंद्र वाघ यांनी दुचाकी शहरातील गायत्री कॉम्प्लेक्स येथील बालाजी नास्ता समोर लावली. काम आटोपून परतल्यावर मुळ ठिकाणी दुचाकी नसल्याचे लक्षात येताच. त्यांनी बस स्थानक, रेल्वे स्थानक व इतर परीसरात सोधाशोध केली असता सापडून आली नाही. मुलगा आदीनाथ वाघला सोबत घेऊन शोधाशोध सुरूच होती. शहर पोलिस ठाण्यात विरेंद्र वाघ यांनी आज फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड  व  प्रविण संगेले हे तपास  करीत आहेत.

Protected Content