पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचखोर वरीष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात

पाचोरा प्रतिनिधी ।  पाचोरा न्यायालयात वारस दाखल्याचे प्रकरणासाठी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाला ७०० रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी पाचोरा न्यायालयात वारस दाखल्याचे प्रकरण दाखल करणेकामी मौजे लोहारी ता.पाचोरा येथील शेतमिळकती व घरमिळकतींच्या एकुण ८ उताऱ्यांचे मुल्यांकन दाखला मिळणेसाठी तक्रारदार यांनी अर्ज सादर केला असता मुल्यांकन दाखला देण्याच्या मोबादल्यात प्रभारी सहाय्यक दुय्यम उपनिंबधक तथा वरीष्ठा लिपीक  ज्ञानदेव साहेबराव चव्हाण (वय-४६) रा. संभाजी नगर पाण्याच्या टाकीजवळ यांनी सातशे रूपयांची लाचेची मागणी केली. आज लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पाचोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content