भरधाव ट्रँकरच्या धडकेत दुचाकीस्वार वृध्द गंभीर जखमी

चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील मंडई पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या दुचाकीला अज्ञात टँकरने दिलेल्या धडकेत वृध्द गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी ६ वाजता ट्रॅकरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, श्रीराम काशीनाथ येशीकर वय ६३ रा. टाकळी ता. चाळीसगाव हे वृध्द आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवार ८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता ते चाळीसगाव शहरातील मंडई पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीने जात असतांना त्याचवेळी पेट्रोल टँकर क्रमांक एमएच १९ सीवाय ७०९४ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात श्रीराम येशीकर हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरीकांच्या सहकार्याने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ट्रॅकर वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाटील हे करीत आहे.

Protected Content