तब्बल ७२ लाखांच्या दाळींचा अपहार करणाऱ्या ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील राधाकृष्ण ग्रो इंडस्ट्रिज या दालमिल कंपनीचे मालकीचे विविध प्रकारच्या डाळीने भरलेले ट्रेलर हा पनवेल येथे न पोहचवता चालकाने सुमारे ७२ लाख २९ हजार ६७८ रूपये किंमतीच अपहार केल्याची धक्कादायक प्रकार सोमवार ६ मे रोजी समोर आला आहे. याप्रकरणी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीतील एस सेक्टरमध्ये तिलक रविंद्र काबरा रा. महाबळ, जळगाव यांच्या मालकीची राधाकृष्ण ग्रो इंडस्ट्रिज या दालमिल कंपनी आहे. या कंपनीतून राज्यातील इतर भागात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी ट्रेलरच्या माध्यमातून पुरविल्या जाता. याच पध्दतीने २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता दालमिल कंपनीतून श्री यश ओडीशी ट्रान्सपोर्ट कंपनीचे ट्रेलर क्रमांक (डीडी ०१ एम ९४६५) मधून सुमारे २७ हजार २९ हजार ६७८ रूपये किंमतीच्या मुगदाळ, उडीददाळ, तुरदाळ, मसुरदाळ आणि चनादाळ अशा दाळी या पनवेल येथे डिलीव्हरीसाठी भरण्यात आले. चालक राजासिंग अग्नीदेवसिंग चौहाण रा. सिंधी राज्य मध्यप्रदेश यांला डिलीव्हरी कामी विश्वासाने ताब्यात दिले. दरम्यान, या दाळींची डिलीव्हरी न करता दाळाची अफरातफर करून ट्रेलर हा भिवंडी रोडला लावून अपहार करून चालक चौहाण हा फरार झाला. हा प्रकार दालमिल कंपनीचे मालक तिलक काबरा यांना सोमवारी ६ मे रोजी सकाळी समजला. त्यांनी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार ट्रेल चालक राजासिंग अग्नीदेवसिंग चौहाण रा. सिंधी राज्य मध्यप्रदेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे.

Protected Content