पाणी घेण्यासाठी रेल्वेतून उतरली, अन‌् चिमुकली स्टेशनवरच अडकली !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी ७ मे रोजी पहाटे ५ वाजता रेल्वे गाडी थांबली. स्टेशनवर पाणी घेण्यासाठी १० वर्षाची चिमुकली बाटली घेवून पलाटवर उतरली. तेवढ्यात रेल्वेगाडी पुढे निघून गेल्याने मुलगी ही शिरसोली स्टेशनवर अडकल्याची घटना घडली. अखेर स्थानिक ग्रामस्थ व रेल्वे पोलीसांच्या प्रयत्नांनी अवघ्या ८ तासात चिमुकली व तिच्या आईची भेट घडवून आणले आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी ७ मे रोजी पहाटे ५ वाजता एक रेल्वे अचानक थांबली. एक १० वर्षाची चिमुकली पाणी घेण्यासाठी या रेल्वे गाडीतून खाली उतरली. तितक्यात रेल्वे निघून गेल्यामुळे ती तिथेच राहून गेली. त्यामुळे चिमुकली ही रडत होती. हा बाब दापोरा व शिरसोलीच्या काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानी मुलीला रेल्वे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर चिमुकलीची तिची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तिचे नाव गाव विचारले असता तिचे नाव लक्ष्मी राकेश आहेरबान् (वय १०, रा. बस्ता, पो. खतना, मध्यप्रदेश) असे तिने सांगितले. मुंबईवरून मध्यप्रदेशातील जबलपूर येथे नातेवाईकाकडे आई व भावासह ती जात होती.

रेल्वे पोलिसांनी तातडीने भुसावळ, बुऱ्हाणपुर स्टेशनसह मनमाड, नाशिक स्टेशनला कळविण्यात आले. मात्र, दूपारी १२ वाजेपर्यंत कोणताही शोध लागला नाही. दुपारी १ वाजता त्या मुलीच्या आईने मुलगी हरविल्याची नोंद भुसावळ रेल्वे पोलिसांकडे केली. भुसावळच्या पोलिसांनी संबधित मुलीचा फोटो त्या महिलेला दाखविल्यानंतर ओळख पटली. सायंकाळी मेडीकल चेकअप व इतर कागदपत्रांची पडताळणी करून, त्या चिमुकलीला तीच्या आईकडे सोपविण्यात आले.

Protected Content