कोल्हापूरमध्ये मतदान रांगेत हृदयविकाराचा झटका आल्याने वृध्दांचा मृत्यू

कोल्हापुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील मतदान केंद्रावर एका वृध्द मतदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रमाबाई आंबेडकर या शाळेत घडली आहे. महादेव श्रीपती सुतार या मृत मतदाराचे नाव आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे.

मतदार रांगेत अचानक चक्कर आल्याने ते कोसळले असता त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. कोल्हापुर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे शाहू महाराज आणि महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक असा सामना होत आहे.

Protected Content