जुन्या वादातून तरूणाला बिअरची बाटली आणि लोखंडी रॉडने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हॉटेल विसावा जवळ जुन्या वादातून तरूणाच्या डोक्यावर बिअरची बाटली आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी सोमवारी ६ मे रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, नरेश मांगिलाल विश्वकर्मा वय ३० रा. छत्रपती शिवाजी नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता नरेश विश्वकर्मा हा तरूण शहरातील हॉटेल विसावा येथे आलेला असतांना जुन्या वादातून विकी सोनवणे, राकेश सुरवाडे, रितेश पवार, शुभम इंधवे, गोलू आतिष सोनवणे आणि परदेशी (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. गेंदालाल मिल, जळगाव यांनी लोखंडी रॉड आणि बिअरची बाटली डोक्यात टाकून गंभीर जखमी केले. तसेच त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या नरेशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार घेतल्यानंतर अखेर सोमवारी ६ मे रोजी रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारे न विकी सोनवणे, राकेश सुरवाडे, रितेश पवार, शुभम इंधवे, गोलू आतिष सोनवणे आणि परदेशी (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. गेंदालाल मिल, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण ठाकरे हे करीत आहे.

Protected Content