प्रसिध्द अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. हे सुरू असताना भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश झाला आहे. आता यात एका अभिनेत्याची सुध्दा भर पडली आहे. प्रसिध्द अभिनेते शेखर सुमन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विनोद तावडे यांनी त्यांचा सदस्यत्वाचा फॉर्म भरून त्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. शेखर सुमन हे २०१२ पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी २०१२ मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिबमधून निवडणूक लढली होती. त्यांच्याविरोधात शत्रुघ्न सिन्हा उभे होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी ७ मे रोजी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शेखर सुमन पक्ष प्रवेशावेळी म्हणाले की, मी आज या ठिकाणी बसेल असं मला कालपर्यंत वाटलं नव्हतं. काही गोष्टी अचानक होऊन जातात. मी अत्यंत सकारात्मक विचार करून आलो आहे. मला इथपर्यंत येण्याचा आदेश दिल्याबद्दल मी सर्वात आधी देवाचे आभार मानतो.

Protected Content