महापालिकेच्या करवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने थोपटले दंड

जळगाव प्रतिनिधी | जळगाव महापालिकेच्या संभाव्य करवाढीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अभिषेक पाटील यांनी विरोध केला असून या संदर्भात आंदोलन उभारण्यासाठी नागरिकांकडून प्रतिक्रिया मागविल्या आहेत.

 

याबाबत वृत्त असे की, जळगाव महापालिका लवकरच करवाढ करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जळगावकरांना नागरी सुविधा प्रदान करण्यात अपयशी ठरल्यानंतरही प्रशासन करांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या तयारीत असतांना याला विरोध देखील होऊ लागला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक पाटील यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. त्यांनी ही करवाढ अन्याय्य स्वरूपाची असून शहरवासियांनी या संदर्भात आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. यातून ते आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभिषेक पाटील यांनी आधी देखील महापालिकेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर आता त्यांनी करवाढीच्या विरोधात दंड थोपटल्याचे दिसून आले आहे. अभिषेक पाटील यांनी ऍड. कुणाल पवार, स्वप्नील नेमाडे,  जितेंद्र चांगरे, आरोही नेवे, अक्षय वंजारी, तुषार इंगळे, कौसर काकर, हेमंत सोनार, गौरव लवांगे, प्रा. अनिल पाटील, रमेश भोळे, फिरोज शेख यांच्यासह आपल्या समर्थकांसह सोशल मीडियात केलेले आवाहन हे चर्चेचा विषय बनले आहे.

Protected Content