खा.उन्मेश पाटलांमुळे पाटणादेवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची मिटली गैरसोय

चाळीसगाव प्रतिनिधी | गेल्या महिनाभरात चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी मंदिराच्या वनक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे मंदिरात जाणारा लोखंडी पूल वाहून गेला. या समस्येबाबत खा. उन्मेश पाटील यांनी तातडीने वन विभाग आणि पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करुन लोखंडी पूल बांधण्यात यावा, अशा सूचना वजा आदेश दिले होते. आज लोखंडी पूल बांधण्यात आला असून आई पाटणा देवीला नमन करण्यासाठी गेलेल्या भाविकांनी सेवा पुन्हा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि खा. पाटील यांचे आभार मानले आहेत.

सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम असून मंदिरे दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत. त्यामुळे गौताळा अभयारण्यात असलेले पाटणादेवी मंदीरात देखील सालाबादप्रमाणे लाखो भाविकांची गर्दी वाढणार होती. माञ मंदिरात जाताना लोखंडी  ब्रिज अतिवृष्टी झाल्याने हा पूल वाहून गेला होता. यामुळे नवरात्र उत्सव असून देखील देवीचे दर्शन करता येत नाही.ही मोठी अडचण उत्पन्न झाली होती.यामुळे भाविकांच्या आनंदावर विरजण पडले होते. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्य पुरातत्त्व विभागाचे अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करून तातडीने हा लोखंडी ब्रिज तयार करावा. अशा सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गेल्या चार दिवसात रात्रंदिवस काम करून हा लोखंडी पूल तयार करण्यात आला आहे.आज या लोखंडी पुलावरून भाविकांची ये-जा सुरू झाल्याने पाटणादेवी माता दर्शन करण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.पाटणादेवी रेल्वे लोखंडी पूल तयार व्हावा यासाठी पुरातत्त्व विभागाचे राकेश शेंडे व महाराष्ट्र राज्य विद्युत कार्यकारी अभियंता शेंडगे साहेब यांनी मोठी मदत केल्याने आज हा लोखंडी पूल तयार झाला आहे.

खासदारांच्या सुचनेने काम मार्गी

पाटणादेवी मंदिराकडे जाणारा लोखंडी पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. याबाबत खासदार उन्मेशदादा पाटील यांनी तातडीने आमच्या विभागाचे अधिकारी यांचेशी संपर्क करून हा लोखंडी पुल तयार करावा अशा सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गेल्या चार पाच दिवसात रात्रंदिवस काम करून हा लोखंडी तयार करण्यात आला असून हा आज भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे अशी माहिती पुरातत्व विभाग औरंगाबादचे वरिष्ठ संरक्षक अभियंता राकेश शेंडे यांनी दिली आहे.

भाविकांची गैरसोय दूर

पाटणादेवी मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सवात राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आल्याने भाविकांची गर्दी होणार होती मात्र अतिवृष्टीमुळे  लोखंडी पूल वाहून गेल्याने भाविकांना दर्शनाला जाणे शक्य नव्हते ही अडचण खासदार उन्मेशदादा पाटील यांनी तातडीने दूर केली असून आज हा लोखंडी पूल भाविकांना ये-जा करण्यासाठी खुला करण्यात आला आहे भाविकांची अडचण दूर झाल्याने उन्मेशदादा पाटील यांना धन्यवाद देतो अशी भावना पाटणा गावाचे सरपंच नितीन पाटील (चौधरी) यांनी व्यक्त केले आहे.

 

Protected Content