बोदवड येथे जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात

बोदवड प्रतिनिधी । बोदवड येथे नाभिक समाजरत्न शूरवीर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची ३८६वी जयंती कोरोनाचे नियम पाळून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सोनोने यांनी केले. यावेळी जिवाजी संघटनेचे अध्यक्ष रितेश बिडके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व जिवाजी महाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा कर्मचारी कार्यध्यक्ष संजय वाघ हे होते. संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते अनंत वाघ व पत्रकार निवृत्ती ढोले, बोदवड नाभिक तालुकाध्यक्ष विवेक वखरे, दुकानदार संघटनेचे अनिल कळमकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात तालुकाध्यक्ष विवेक वखरे, सोपान महाले, अनंत वाघ, अमोल आमोदकर, हरिभाऊ सुरंशे, संजय वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

रितेश बिडके यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला नाभिक बांधव संतोष कुंवर, संजय वाघ, विवेक वखरे, सोपान महाले, योगेश वखरे, रितेश बिडके, अनिल कळमकर, संजय बिडके, हरिभाऊ सुरंशे, ईश्वर सुरंशे, अमोल आमोदकर, राजू बाभुळकर, प्रकाश बाभुळकर, निवास बाभुळकर, गोपाळ वखरे, गोपाळ बोरसे, किशोर डापसे, गोपाल डापसे, राजेंद्र वर्मा, गणेश बोरणारे व अनेक नाभिकबांधवांची उपस्थिती होती.

याबरोबर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते भरत पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष गजानन घोडके, नगराध्यक्ष पती सईद बागवान, नगरसेवक देवा खेवलकर, नगरसेवक धनराज गंगतिरे, नगरसेवक संजय गायकवाड, नगरसेवक सुनिल बोरसे, शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी, भास्कर गुरचळ अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट देऊन प्रतिमेचे पूजन केले.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!