आजपासून ‘प्रो-कबड्डी’ स्पर्धेला प्रारंभ

kabbadi

नवी दिल्ली प्रतिनिधी । क्रीडा विश्वातील लोकप्रिय झालेल्या ‘प्रो-कबड्डी’ स्पर्धेचे आजपासुन सातवे सीझन सुरु होत आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रो-कबड्डीच्या मागील सहा सीझनला मिळालेल्या तुफान यशानंतर आयोजकांनी यावेळी स्पर्धेच्या स्वरूपात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ही स्पर्धा डबल राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. या बदलामुळं प्रत्येक संघ प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध दोनदा खेळताना दिसेल. चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. तसेच यंदाच्या ‘प्ले-ऑफ’सह स्पर्धेत एकूण ७२ सामने होणार आहेत. ही स्पर्धा २० जुलै ते १९ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच तब्बल तीन महिने चालणार असून लढती हैदराबाद, मुंबई, पाटणा, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, पुणे, जयपूर, पंचकुला, ग्रेटर नॉएडा अशा १२ शहरांमध्ये हे सामने रंगणार आहेत. सलामीचा सामना हैदराबादच्या गाचीबावली इनडोअर स्टेडियमवर यू मुंबा आणि तेलुगू टायटन्समध्ये रंगणार आहे. स्पर्धेतील लक्षवेधी लढत संध्याकाळी गतविजेता संघ बेंगळुरू बुल्स आणि तीनवेळा चॅम्पियनशीप पटकावणाऱ्या पटना पायरेट्समध्ये याच स्टेडियमवर होणार आहे.

Protected Content