फुले मार्केटमध्ये जुन्या वादातून दोन गटात हाणामारी

Crime l 1

जळगाव प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री ८.३० वाजता दोन गटामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. एका गटातील एकाचा मोबाईल चोरीला गेला तर दुसऱ्‍या गटातील दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन कोळी हा फुले मार्केटमध्ये एका दुकानावर काम करतो. शुक्रवारी चेतन हा मार्केटमध्ये असताना शेख सादीक शेख गयास, शेख दानिश शेख गयास, मोहसिन खान रशीद खान, कासीब मोहम्मद खलील, साकीर शेख व यांच्यासह दोन ते तीन जण त्यांच्याजवळ रात्री आले. त्यांनी मागील भांडणाच्या कारणावरून चेतन याच्या धारधार शस्त्राने वार केला. यात चेतन गंभीर जखमी झाला. दुसरीकडे दीपक सोनवणे हा त्याठिकाणी आला असता त्याच्यावरही त्यांनी वार करून त्यालाही जखमी केले. दोघांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर रात्रीच चेतन कोळी याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या गटाच्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिपेठेतील शेख सादीक शेख गयास याचे फुले मार्केटमध्ये कटलरीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री शरद नारळे, गणेश सोनवणे, पवन भोई, किरण सोनवणे, दीपक सोनवणे, चेतन कोळी, अनिल राठोड, डेबा उर्फ गण्या अशांनी शेख सादीक याच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून मारहाण केली. तरूणांनी सादीक यास लाथाबुक्कयांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी शेख सादीक यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक
चेतन कोळी याच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात शेख सादीक शेख गयास, शेख दानिश शेख गयास, मोहसिन खान रशीद खान, कासीब मोहम्मद खलील यांना अटक करण्यात आली असून शेख सादीक याच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात शरद नारळे, गणेश सोनवणे, पवन भोई, किरण सोनवणे या चौघांना अटक करण्यात आली आहे.

Protected Content