Home Uncategorized दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

0
48
Sheila Dikshit
Sheila Dikshit


Sheila Dikshit

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचे आज निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अखेर आज वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शीला दीक्षित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुपारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. सध्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची जबाबदारी होती. शीला दीक्षित यांनी दिल्लीचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. शीला दीक्षित या 1998 ते 2013 पर्यंत सलग 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. शीला दीक्षित यांच्या जाण्याने दिल्लीच्या राजकारणासह काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


Protected Content

Play sound