एमआयडीसी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बकरीईद व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी दोन्ही समाजांनी आपले धार्मीक कार्यक्रमात कायद्याचे जतन करण्याचे आवाहन केले.

 

याप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे, महापालिकेचे प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव बोरसे यांची उपस्थिती होती.

 

या बैठकीत सर्व धर्मीय शांतता समितीच्या काही निवडक प्रतिनिधींनी आपल्या सूचना  सादर केल्या. त्यात प्रामुख्याने एमआयएमचे माजी अध्यक्ष जिया बागवान, जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, एमआयएमचे महानगर अध्यक्ष दानिश शेख, नियाजली फाउंडेशनचे अयाज अली, शहर महानगरपालिकेचे नगरसेवक सदाशिव ढेकळे  यांनी आपले विचार बैठकीत मांडले. त्यात प्रामुख्याने कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावता कामा नये त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करून आपापली धार्मिक कर्तव्य पार पाडण्याचे आश्वासन संबंधितांनी पोलीस विभागास दिले.

 

याबैठकीला पोलीस पाटील सुवर्णा उमरे, सविता पंडित, विठ्ठल पाटील, रायसिंग जयसिंग, इकबाल पिरजादे, फारुख शेख, दस्तगीर शाह, अयाज अली, एडवोकेट आमिर शेख ,शेख अहमद सर, अरुण जाधव, दिलीप पाटील, संजय चिमण कारे, चंद्रशेखर सूर्यवंशी, शरद सोनवणे, वसीम शेख, मुशीर खान ,रियाज काकर, आसिफ शाह, अखिल खान, जीया बागवान, शकील मदनी, सलीम पटेल, विनोद गोपाळ, उमेश पाटील, साहेबराव बागुल ,बाबू पिंजारी, सुरेश नरदे ,वाहेद खान, श्रीकृष्ण बारी, शरद राजाराम आणि अनिस शहा आदींची उपस्थिती होती.

 

Protected Content