शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या साप्ताहिक हवामान अंदाजानुसार पुढील आठवड्यात पश्चिम मध्य व दक्षिण भारतात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आठ दिवसापासून महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नसून कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे.

कृषी विभागाने यापूर्वीच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला दिला आहे. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते व दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज पाहून व जमिनीतील उपलब्ध ओलावा पाहूनच पेरणी बाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

Protected Content