मुक्ताईनगरात रोहिणी खडसे यांनी अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा केली साजरी

मुक्ताईनगर, पंकज कपले । येथे वडाच्या झाडाचे रोपण करून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी पर्यावरण पुरक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली.

वटपौर्णिमा हा दरवर्षी पावसाळ्यात येणारा पहिला सण या दिवसांपासून सणांना सुरुवात होते आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात. सावित्रीने यमदेवाकडून आपले पती सत्यवानाचे प्राण याच दिवशी परत आणले. अशी पुराणात आख्यायिका आहे. आख्यायिके प्रमाणे हि घटना ज्यादिवशी घडली, त्यादिवशी पौर्णिमा होती. त्या दिवसापासून सुवासिनी महिला या पौर्णिमेच्या दिवशी पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला सत्यवानाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे, यासाठी हे व्रत करतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली आणि यमदेवाने तिथेच सत्यवानाला त्याचे प्राण परत दिले असे आख्यायिकेत म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन केले जाते.

महाराष्ट्रीयन महिला हा सण अतिशय उत्साहात साजरा करतात. वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून आणि त्याची पूजा करून हे व्रत करण्यात येतं. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या नवऱ्यासाठी उपवास ठेवते. व त्याच्या दिर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर यांनी आदिशक्ती मुक्ताई सह सूतगिरणी येथे वडाचे झाड लावून अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली.
यावेळी सूतगिरणी मध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांसमवेत त्यांनी वडाच्या झाडाचे रोपण करून त्याची पुजा करून महिला कामगारांसमवेत हळदी कुंकु करून पर्यावरण पुरक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली.

सावित्री मातेने यमाकडून आपले पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले अशी पौराणिक कथा आहे तेव्हापासून महिला वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पुजन करून आपल्या पतीच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतात. आपल्या प्रत्येक सणा मागे एक शास्त्रीय कारण आहे. वडाच्या झाडाचे आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व आहे. वडाची मुळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चीक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो. वडाचे झाड 24 तास ऑक्सिजन प्रदान करतं. वडाचे झाड तासाला 712 किलो एवढ्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडत असते. त्यामुळे वडाजवळ जाऊन काही काळ घालवणे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहणे. त्याने ताजी हवा मिळते आणि ताजेतवानं झाल्यासारखं जाणवतं. आपण कोरोना काळात ऑक्सिजन कमतरतेमुळे काय परिणाम होतात हे अनुभवले भविष्यात असे घडू नये यासाठी आज वडाच्या झाडाचे रोपण करून वटपौर्णिमा साजरी केली.

पावसाळ्यात अजून शक्य तेवढ्या वडाच्या झाडाचे रोपण करण्याचा माझा मानस आहे.
– रोहिणी खडसे खेवलकर
अध्यक्षा जे डी सी सी बँक, जळगाव

Protected Content