समन्वय असल्यास पोलीस व पत्रकार चांगले मित्र होऊ शकतात – पो.नि.ज्ञानेश्वर जाधव

जळगाव प्रतिनिधी । पत्रकार व पोलीस यांच्यात समन्वय असल्यास ते एकमेकांचे चांगले मित्र बनून जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतात, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.

एरंडोल पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाच्या कार्यालयात स्वागत सत्कार कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बी.एस.चौधरी, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य रोहिदास पाटील, सचिव संजय बागड, शहराध्यक्ष कैलास महाजन, कार्याध्यक्ष प्रा.सुधीर शिरसाठ, संपादक प्रविण महाजन हे उपस्थित होते.

यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी यांच्याहस्ते नूतन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यांचे सोबत आलेले गोपनीय शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल संदिप सातपुते यांचे देखील स्वागत करण्यात आले. याप्रसंगी एरंडोल तालुका पत्रकार संघाचे सदस्य पंकज महाजन, राजु ठक्कर, विक्की खोकरे, प्रा.नितीन पाटील, शैलेश चौधरी, पिंटू राजपुत, आबा महाजन, दिपक बाविस्कर, भाऊसाहेब पाटील, मनोहर ठाकुर, उमेश महाजन आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.एस.चौधरी यांनी केले. सूत्रसंचलन कैलास महाजन यांनी तर आभार शैलेश चौधरी यांनी मानले.

Protected Content