जिल्हा रुग्णालयात ५५ जणांनी घेतला कोरोना प्रतिबंध लसीचा दुसरा डोस

जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी डॉक्टर्ससह कक्षसेवक, परिचारिका, परिचारक, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी  यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी १७ फेब्रुवारी रोजी  दिवसभरात १४१ जणांनी लसीकरण करून घेतले. 

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशील्ड’ हि लस तयार झाली आहे. दिवसभरात पोलीस, डॉक्टर्ससह आरोग्य यंत्रणेतील १४१ जणांनी लस घेण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेऊन प्रक्रिया पूर्ण केली. यात ८६ जणांनी पहिल्यांदा तर ५५ जणांनी ३० दिवस झाल्यावर दुसरी लस घेतली आहे. सोमवारपासून देशभरात दुसरा डोस देण्यास प्रारंभ झाला आहे.  

कोरोना लसीविषयी जनसामान्यांमध्ये काहीशी भीती आहे. मात्र आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी तसेच, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील पहिली लस घेऊन हि भीती दूर करीत आदर्श निर्माण केला आहे. आतापर्यंत १ हजार ८६५ जणांनी “शावैम” मध्ये लसीचा पहिला तर ११५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लस घेतल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात  डॉ. डॅनियल साझी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.  याठिकाणी सार्वजनिक आरोग्य परिचारिका अर्चना धिमते, कर्मचारी नितीन राठोड, डाटा  एंट्री ऑपरेटर  बापूसाहेब पाटील, इशांत पाटील, अभिषेक पवार, विश्वजीत चौधरी यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले.

 

Protected Content