वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्प विज्ञान सप्ताहाची सांगता

मुक बधीर विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत अनुभवली सर्प जीवन शैली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर  १५ ऑगस्टपासून वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे सर्प विज्ञान प्रबोधन सप्ताह साजरा करण्यात आला होता. २१ ऑगस्ट रोजी शारदाश्रम विद्यालय पर्यावरण शाळेत जनजागृती कार्यक्रम राबवून सप्ताहाची सांगता करण्यात आली. सप्ताहात १५ शाळा, शेती शिवार, आणि आदिवासी पाड्यांवर सर्प दंश जनजागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात आले.  यात ५ हजार विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. सप्ताहाच्या समारोप प्रसंगी

मुख्याद्यापिका चेतना नन्नवरे, अर्चना उजागरे, वन्यजीव संस्थेचे संस्थापक बाळकृष्ण देवरे , सचिव योगेश गालफाडे, यांच्या हस्ते नागाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. केशव स्मृती प्रतिष्ठान चे श्रवण विकास केंद्र, बी. यू. रायसोनी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या 3 शाखा, शानबाग विद्यालय, शकुंतला माध्यमिक विद्यालय, रावसाहेब रुपचंद विद्यालय, आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूल, जयदुर्गा इंग्लिश मिडीयम स्कूल, मनपा उर्दू हायस्कूल, गिरजा बाई चांदसरकर प्राथमिक विद्यालय, भगीरथ हायस्कूल, भुसावळ, एरंडोल आणि जामनेर येथील 4 शाळा आणि पाड्यावर जनजागृती कार्यक्रम घेतले गेले.

सापांची शास्त्रीय माहिती , प्रथमोपचार, सर्प आपल्या घरात, परिसरात येण्या पासून कसे रोखता येईल यावर मार्गदर्शन केल्या नंतर प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रश्न उत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न उत्तर कार्यक्रमात सापाची जीभ दुभंगलेले का असते, सापाच्या शरीरात विष कुठे असते, साप पाण्यात श्वास कसा घेतो, सापाला कान का नसतात, मग सापाला पाय का नाहीत, अजगराच्या पोटात कोणते असिड असते, साप मिलन कसे करतात, असे अनपेक्षित प्रश्न विचारल्याने शिक्षक देखील अवाक झाले.

सर्पमित्रांनी विद्यार्थ्यांच्या प्रतेक प्रश्नाला समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले, विद्यार्थी शास्त्रीय माहिती घेत आहेत हे बघून या भावी पिढीला याच प्रकारच्या शास्त्रीय अभ्यासात्मक विचारांची गरज आहे असे बाळकृष्ण देवरे यांनी सांगितले, योगेश गालफाडे यांनी सर्प अंधश्रद्धा यावर मार्गदर्शन केले.

श्रवण विकास केंद्रातील मुक बधीर विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला, केशव स्मृतीच्या श्रवण विकास केंद्रात देखील सर्प जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेचे सर्पमित्र प्रदीप शेळके यांनी सांगितलेली माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हातवारे द्वारे इशार्यांच्या सहाय्याने समजाऊन सांगितली. विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्याच सांकेतिक भाषेत प्रश्न विचारून मनातले गैरसमज दूर करून घेतले. जनजागृती सप्ताहात सर्पमित्र वासुदेव वाढे, राजेश सोनवणे, प्रदीप शेळके, जगदीश बैरागी , सतीश कांबळे, गोकुळ पाटील, संतोष चौधरी, यांनी सहभाग नोंदवला मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, संस्थापक रवींद्र सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content