चितोडा झेडपी शाळेतील मुलांना बाराखडी येत नाही; गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील चितोडा या गावातील जिल्हा परिषद मराठी मुलांमुलीची शाळा आहे. या शाळेची स्थापनेस शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असून या मराठी शाळेतील शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरलेला दिसून येत आहे. अशी तक्रार यावल येथील गटविकास अधिकारी व शिक्षण विभागातील गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे चितोडा गावातील किरण तायडे यांनी केली आहे.

चितोडा गावातील जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक ते शंभर पर्यंत सुद्धा बाराखडी येत नाही. अशी परिस्थिती शिक्षणाची झाली आहे. यावल तालुक्यातील चितोडा येथे जिल्हा परिषद मराठी मुलांमुलींची शाळा आहे. या ठिकाणी सध्या ४४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत ४४ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु वास्तविक पाहता एकाही विद्यार्थ्याला बाराखडी सुद्धा वाचता येत नाही यावरून असे दिसुन होते की या शाळेत शैक्षणिक दर्जा घसरला आहे.

शाळेच्या शिक्षकांचे पुर्णपणे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे तक्रार निवेदनात म्हटले आहे. शैक्षणिक दर्जा वाढण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत परंतु या ठिकाणी त्या उपक्रमांची देखील पायमल्ली होताना दिसत आहेत. या शाळेत शिकणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक हे मोल मजुरी करणारे आहेत. परंतु ज्या शिक्षकांवर विश्वास ठेऊन पालकांनी आपल्या मुलांचा या शाळेत प्रवेश घेतला आहे, ते शिक्षकांची वागणुक एखाद्या राजपत्री अधिकाऱ्यासारखी दिसून येत आहे, असल्याचे तक्रार निवेदनात किरण तायडे यांनी म्हटले आहे .

Protected Content