उपवनसंरक्षक यांच्या कारवाईत महागडा डिंक व तीन मोटरसायकल जप्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल वनपरिक्षेत्र अधिकारी, रावेर (प्रादेशिक) यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार यावल व रावेर वनक्षेत्रातील पाल परिमंडळ मधील पाल राऊंड पथक यांच्यासह कम्पार्डमेंट क्र. ५६ मधून मांजर रस्ता वन परिसरात वनविभागाचे पथक गस्त करीत असताना तीन दुचाकी मोटरसायकल वरून महागड्या डिंकाची अवैधरित्या वाहतुक करतांना आढळून आल्याने वनविभागाच्या संयुक्त कारवाईत सुमारे ३० हजार रूपये किंमतीचे डिंक व १ लाख पन्नास हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबतची मिळालेली माहिती अशी की ‘पाल वनक्षेत्रात १९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास वन विभागाच्या सुत्रांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वनक्षेत्रातील मांजरा रस्ता परिसरात संशयित आरोपी हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी मोटरसायकल क्रमांक एच.एफ. डिलक्स एम.पी. १० एम.ए ९५१६, आणि स्मार्ट हिरो एम.पी. १० एम. जी. ४४९२ व हिरो होंडा एम.पी. १० एम. जी. ३४९४ असे असून या वाहनाने अवैध डिंक घेऊन जात असताना मिळून आले. त्यात साधारण ११८ किलो सलाई व २० किलो धावडा असा डिंक वनविभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

सदरच्या या गुह्यातील संशयित आरोपी हे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन वाहने सोडून पसार झाले असुन, वन विभागाच्या माध्यमातुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आले नाही, तरी याबाबत वन गुन्हा क्र. २/२०२४ १९ मार्च २०२४ रोजी जारी केला. या डिंकाची नुकसानी किंमत सलाई ११८ किलो ११०-१२९८० रू. धावडा २० किलो २००-४००० रू. इतकी आहे. तसेच तीन मोटरसायकलची किंमत ही बाजार भावाप्रमाणे १३३००० इतकी असुन, एकूण सर्व मिळून नुकसानी किंमत १४९९८० इतकं आहे.
सदर कार्यवाहीत अजय बावणे वनक्षेत्रपाल रावेर, डी.जी.रायसिंग वनपाल पाल, एम.एम तडवी वनरक्षक व कायम वनमजूर यांचा सहभाग होता. सदरची कार्यवाही ही वनसंरक्षक धुळे ऋषिकेश रंजन, यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर एस शेख तसेच यावल विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वन गुन्ह्याबाबत पुढील तपास वनपाल पाल हे करीत आहे

Protected Content