यावल शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसुलची धडक कारवाई

यावल प्रतिनिधी । येथील महसुलच्या पथकाने शहरात होणारी अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या डंपरवर धडक कारवाई करत दंडात्मक कारवाई केली.

यावल महसुल पथकाने आज २२ मार्च रोजी दुपारी शेळगाव मार्गाने यावल शहराकडे विनापरवाना अवैध गौण खनिज डंपर ( क्रमांक एमएच १९ झेड ५८८८) मध्ये भरून वाहतुक करतांना महसुलचे प्रभारी तहसीलदार आर.डी.पाटील व निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी, यावल शहर तलाठी ईश्वर कोळी, शिपाई रामा कोळी यांच्या पथकान कारवाई केली.  डंपर वरील वाहन चालक पंढरी बाबुलाल कोळी रा. जळगाव हा डंपर सोडून पळ काढला असता पाठलाग करून पकडले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करण्यात आला आहे. या  कारवाईमुळे वाळु माफीयाचे चांगलेच धाबे दणाणले आहे .

Protected Content