श्रावणमासानिमित्त श्री क्षेत्र मनुदेवी मंदीरात दर्शनसाठी गर्दी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी येथे श्रावण अधिक मासानिमित्त भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. जिल्हाभरातील हजारो भाविकांनी यादिवशी हजेरी लावली होती.

यावर्षी तब्बल १९ वर्षानंतर श्रावणात हा अधिक मास आला आहे. अधिकमासा निमित्ताने हजारो भाविक मनुदेवी श्रीक्षेत्रावर विधिवत पूजा अर्चा करून देवीचे दर्शन घेत आहेत. यावेळी भक्तगण मंदिरात जाऊन व आंघोळ करून तांब्याचे दिव्यावर कापूर लावून पाण्याच्या प्रवाहात विसर्जन करतात. त्या अनुषंगाने येथे अधिकमासा निमित्ताने भाविकांची खूप गर्दी दिसून येत आहे . त्याचप्रमाणे भाविकांची मनुदेवी तीर्थक्षेत्रावर असलेल्या दुकानावर तांब्याची दिवे , पितळी मूर्ती , ह्या खास अधिक मासाच्या निमित्ताने खरेदी करताना दिसुन येत आहे. तीन वर्षानंतर आलेला अधिक मासाच्या अनुषंगाने मनुदेवी परीसरातील संपूर्ण दुकानदारांनी आपले दुकाने थाटली आहेत.

अधिक महिन्याला विविध नावांनी संबोधले जाते. त्याला मलमास, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात.योगायोग श्रावण महिन्यात अधिक महिना आला आहे. त्यामुळे यावेळी श्रावण महिना ५९ दिवसांचा असणार आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र मनुदेवी येथे जवळपास दोन महिने मोठ्या प्रमाणावर भाविकांची अलोट गर्दी ही राहणार असुन यासाठी भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यासाठी मनुदेवी संस्थान कर्मचारीही परिश्रम घेत आहेत.

दर रविवारी चिंचोली व मनुदेवी येथे पोलीस कर्मचारी नियुक्ती करावी सध्या श्रावण सोमवार व अधिक मासानिमित्त मनुदेवी श्रीक्षेत्र परीसरात भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.सध्या पावसाळा सुरू असल्याने मनुदेवीचा धबधबा प्रवाहित झाला असुन याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची ही संख्या वाढली आहे.तर शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी ही याचा आनंद लुटण्यासाठी येथे येत असतात. काही टवाळखोर तरूण बेजबाबदारपणे वाहने चालवतानाही दिसुन येतात.तर बरेच वेळा भाविक व पर्यटकांमध्ये वाद होतात. मनुदेवी मंदिर परिसरात व चिंचोली चौफुलीवर दर रविवारी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी ही परिसरातील भक्तगण व सुज्ञ नागरीकांकडुन व्यक्त केली जात आहे.

Protected Content