शेतात वीज कोसळल्याने शेळी मृत्यूमुखी

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील पोपटगर येथे शुक्रवारी २६ एप्रिल रोजी ७ वाजता पोपटगर शिवारातील शेतात वीज कोसळून एक शेळी मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.

पारोळा तालुक्यातील पोपट नगर येथे सोमसिंग शंकर राठोड यांच्या शेतात वीज पडून बकरी मृत्यूमुखी पडली. घटनास्थळी पशुवैद्यकीय दवाखाना शिरसमणी येथील डॉ. शांताराम पाटील डॉ शुभम पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सकाळी ६ वाजेपासून ढगाळ वातावरण होऊन ढगांचा गडगडात सह बारीक पावसाच्या सरी बरसल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली. यावेळी घटनास्थळी सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासह तलाठी ग्रामसेवक यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content