चाळीसगाव येथे पर्यावरण पूरक गणेशोत्सव सजावट साहित्य बनविण्याची कार्यशाळा

WhatsApp Image 2019 08 31 at 7.07.43 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | वसुंधरा फाउंडेशनतर्फे चित्रकार धर्मराज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव रोड, संत रविदास सोसायटीतील रंभाई आर्ट गॅलरीमध्ये पर्यावरण बचावचा संदेश देण्यासाठी गणपती सजावटीचे साहित्य बनविणे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

गणेशोत्सवात सजावटीसाठी प्लॅस्टिक तसेच थर्माकोलच्या वस्तूंमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी कागदापासून पर्यावरण पूरक असे गणपती सजावटीसाठी लागणारे साहित्य याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात आले. यावेळी मंचावर सुनीता महाजन, डॉ.सुजित वाघ डॉ. भक्ती महाजन ,चित्रकार धर्मराज खैरनार ,साहिल दाभाडे ,सविता खैरनार, उपस्थित होते. यावेळी सुनीता महाजन यांनी या उपक्रमाचे कौतुक करत स्वतः गणेशोत्सव सजावटीसाठी लागणारे साहित्य बनवण्याचा आनंद वेगळाच असतो. या उपक्रमात तयार होणाऱ्या साहित्यांनी पर्यावरणाचा -हास रोखला जाऊ शकतो. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. प्रास्ताविक चित्रकार धर्मराज खैरनार यांनी केले. डॉ. सुजित वाघ यांनी गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहचवत असल्यानं तो कटाक्षाने टाळायला हवा. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठय़ा आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते. कार्यशाळेत पर्यावरणपुरक गणपती सजावटीचे साहित्य कसे तयार करायचे या विषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शक श्री. खैरनार यांनी कागदापासून अतिशय सहजरित्या वेगवेगळ्या आकाराचे तोरण, मखर, माळा, चक्र, कागदी, फुले, अशा विविध वस्तू बनवण्यास शिकवले. विद्यार्थ्यांनी स्व-निर्मितीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला यात अवंती महाजन, सलोनी कवाडे, आदिती गरुड, खुशी महाले, प्रणव पाटील या विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून बक्षीस देण्यात आले. यावेळी बापू खैरनार, साहील दाभाडे कमलेश पवार ,सागर ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले.

Protected Content