श्री जैन युवा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी जयेश ललवाणी यांची निवड

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील श्री जैन युवा फाउंडेशनची सन २०२०-२०२१ ची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे . अध्यक्षपदी जयेश ललवाणी, सचिवपदी रितेश पगारिया तर कोषाध्यक्षपदी अमोल फुलफगर यांची निवड झाली आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात श्री जैन युवा फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासणारे कार्यक्रम घेतले आहे. कोरोना साथरोगाच्या काळात देखील प्रशासनाला मदत म्हणून वैद्यकीय क्षेत्रात विविध स्वरूपाची मदत श्री जैन युवा फाउंडेशनने मिळवून दिली आहे. गेल्या वर्षभरात दर्शन टाटीया यांच्या अध्यक्षतेखाली आणि सचिव रितेश छोरीया, कोषाध्यक्ष पियुष संघवी यांच्या नेतृत्वाखाली श्री जैन युवा फाउंडेशनने स्तुत्य उपक्रम घेतले आहे.

श्री जैन युवा फाउंडेशनच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने एका ऑनलाईन बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड झाली. यात नवीन अध्यक्षपदी जयेश ललवाणी, सचिव म्हणून रितेश पगारिया आणि कोषाध्यक्ष अमोल फुलफगर यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून आनंद चांदीवाल, कार्याध्यक्ष पियुष संघवी, सह सचिव पारस कुचेरिया, सह कोषाध्यक्ष म्हणून प्रतीक कावडीया, जनसंपर्क अधिकारी प्रवीण छाजेड यांची नियुक्ती झाली आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून मनोज लोढा, प्रवीण पगारिया, सचिन राका, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, अनिष चांदीवाल, चंद्रशेखर राका, दर्शन टाटीया, सौरभ कोठारी, राहुल बांठिया, रितेश छोरीया, प्रणव मेहता, अमोल श्रीश्रीमाळ, संदीप सुराणा यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या कार्यकारिणीचे जैन समाजातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.

Protected Content