ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्ररुपी चैतन्य शिवालयामुळे परिसरात होईल आत्मानुभूती

एरंडोल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारे एरंडोल परिसरात शांती, सुख, आनंद प्रेम आदि दिव्यगुणांमुळे आत्मानुभूती होईल असे प्रतिपादन ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र आत्मनुभूती भवनचे उद्घाटन राजयोगीनी ब्रह्माकुमारी उषादीदीजी यांनी केले.

राजयोगाच्या अभ्यासामुळे मूल्यनिष्ठ समाजाची निर्मीतीसाठी ब्रह्माकुमारीजने आत्मानुभूती राजयोग सेवाकेंद्राची सुरुवात केली आहे. आपल्या संबोधनात उषादीदीजी पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे विविध प्रकारांची सजावट, सुशोभीकरणाने वातावरण प्रसन्न होते. त्याबरोबरच सेवाकेंद्राच्या राजयोग ध्यानधारणेमुळे निर्माण झालेले वातवरण अनेक आत्म्यांना आकर्षीत करेल. कोणत्याही व्यक्तिच्या जीवनातील महत्व त्यांच्या आदर्शानी होते. सिद्धांतांनी होते. कर्मास नेहमी आठवण केली जाते. दिव्य गुणांचे सिंचन, आत्म्यांना परिवर्तन करणे, करनकरावनहार परमात्मा करतो. परमात्म्यांची दिव्य शिक्षणांचे सिंचन, ज्ञानामृतचे सिंचन. परमात्मा जो नवीन जगाची स्थापना करतो, ही स्थापनाच आपणासर्वांसाठी एक अमूल्य भेट आहे. ही चावी जर विसरले तर आपण त्या स्वर्णीम युगात जावू शकत नाही. मनमनाभव, मद्याजीभव, योगी बनो, पवित्र बनो ही ती किल्ली आहे. मायावर आपले अधिपत्य व्हावे.

पदमालय नगरीत पदमांची अविनाशी कामाई –
या सेवाकेंद्रात शिकविल्या जाणाज्या ज्ञानाने आध्यात्मिक आनंद मिळतो असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदीजींनी केले. दिव्यगुणांचे प्रतिक पांडव आहे. कदम कदम पदमों की कमाई हेच या पदमालय नगरीचे वैशिष्ट्ये असल्याचेही त्या म्हणाल्या. मेहनतीने या सेवाकेंद्राचे निर्माण सर्व राजयोगीच्या सहकार्याने बनले आहे. असे एरंडोल सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी पुष्पादीदी यांनी सांगितले. माऊंट आबूहून बी.के. दत्तुभाई, बी.के. विजयभाई, बी.के. मुकेशभाई, बी.के. शंकरभाई तसेच जळगाव सेवाकेंद्राचे बी.के. संदिप यांनी यांनीही समायोचित मनोगते व्यक्त केलीत.

मातेश्वरी मम्मा हिलींग गार्डन बनविण्याचा संकल्प –
अॅङ ओम त्रिवेदी यांनी याप्रसंगी सेवाकेंद्राच्या परिसरात विद्यालयाच्या आद्य संचालिका मातेश्वरी मम्मा यांच्या नावाने हिलींग गार्डन बनविण्याचा संकल्प सर्वांसमोर सांगितला. गार्डन मध्ये आध्यात्मिक ज्ञानाबरोबर शांतीचे प्रकंपनही परिसरात होणार आहेत.

एरंडोलकरांशी उषादीदींचे भावनिक नाते –
निवृत्त तहसिलदार अरुण माळी यांनी ब्रह्माकुमारी उषादीदी आणि एरंडोलकर यांचे एक भावनिक नाते असल्याचे स्पष्ट करतांना भविष्यात होणाज्या एरंडोल सेवाकेंद्राच्या विविध प्रकल्पाचे उदघाटन करावे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी इंगळे सर यांनी केले सूत्रसंचलन ब्रह्माकुमारी हेमलता दीदी यांनी केले तर आभार अरुण माळी,यांनी मानले. व्यासपीठावर जळगाव उपक्षेत्रीय निर्देशिका ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदीजी, ब्रह्माकुमारी पुष्पादीदी, ब्रह्माकुमारी क्षमादीदी, सवितादीदी, छायादिदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज ठाकूर, पुंडलिक पवार, कृष्णाशेठ, दिलीप महाजन, आबा महाजन, व ब्रह्माकुमारीज्च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content