फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांनी यावल तालुक्यातील प्रमुख रस्ते चौपदरीकरण यासह शिरागड येथे पुल बांधकामाबाबत मागणीचे निवेदन ना.गडकरी यांना दिले.
या निवेदनात माजी सभापती रविंद्र पाटील यांनी म्हटले आहे की, यावल तालुक्यात वाहनांची रहदारी व वाहतूक जास्त असल्याने अरुंद रस्त्यानं अभावी वाहतुकीस खुप अडचणीचा सामना करावा लागतो. तरी मुख्य रस्त्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी यावल तालुक्यातील अरुंद रस्ते चौपदरीकरण करून मिळावे तसेच यावल तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र शिरागड येथील संप्तशृगी गडावर देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
या भाविकांना दर्शनासाठी येण्या- जाण्यासाठी नदी पात्रातून पायी प्रवास करून जावे लागते. त्यासाठी त्या ठिकाणी पुल बांधकाम करुन मिळावा.तसेच आपल्या स्तरावरुन सर्वाधीक वाहतुक व वर्दळीचे मार्ग असलेले यावल ते भुसावळ १८ किमी , यावल ते फैजपूर १८ किमी, फैजपूर ते भुसावळ १८ किमी, किनगाव- इदगाव – जळगाव २६ कि.मी हे रस्ते चौपदरीकरण करण्यात यावे व श्री क्षेत्र शिरागड ते न्हावी प्र. अडावद यादरम्यान भोनक नदीवर पुल बांधकाम करणे.
यासाठी जळगाव जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी केन्द्रीय रस्ते वाहतुक व दळणवळण मंत्री मा.नितीन गडकरी यांना जळगाव येथे भेटून निवेदन देऊन रस्ते चौपदरीकरण व पुलाचे काम करण्यासाठी निवेदन दिले. या प्रसंगी भारतीय जलता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे व पक्षाचे इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
स्ते चौपदरीकरण व श्रीक्षेत्र शिरागड येथील पुलाचे बांधकाम हा तालुक्याच्या विकास कामांबाबत चांगला मुद्दा असून सर्वे व डीपीआर साठी ठेवू. असे सूचक आश्वासन मा.नितीन गडकरी यांनी यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविन्द्र पाटील यांना दिले आहे.