दहिगाव येथून कापसाने भरलेला आयसर चोरण्याचा प्रयत्न फसला!

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतकऱ्याच्या गोदामातून अज्ञाताने कपाशी आयसर मध्ये भरून चोरून नेण्याचा त्याचा प्रयत्न फसल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केलेली नाही.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील दहिगाव येथील प्रेमचंद शांतीलाल जैन यांचे सावखेडा सिम रस्त्यालगत गोदाम आहेत. त्यात त्यांनी ३० क्विंटल कापूस भरलेला असताना अज्ञाताने १४ डिसेंबर रोजच्या मध्यरात्री अज्ञाताने गोदामाचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून त्यातील कापूस बाहेर उभा असलेला आयसर मध्ये भरून चोरून नेण्याचा प्रयत्न करत असताना आयसर सुरूच न झाल्यामुळे कापूस चोरून नेण्याचा त्याचा प्रयत्न फसल्याची घटना १५ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंदाजे ७ लाखांचा हे कापूस असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिकांनी आयसरच्या ठिकाणी धाव घेतल्याने कापसाची चोरीला गेले नाही. दरम्यान याआधीही परिसरात केबल, पशुधन चोरीचे प्रमाण वाढतच आहे. परंतु शेतकऱ्यांनी याबाबत पोलिस स्थानकात तक्रार दाखल केलेली नाही. तरीही घटनास्थळी जावुन दहीगाव दूर क्षेत्राचे सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी व पोलीस पाटील संतोष पाटील यांनी घटनेची माहीती घेतली आहे.

Protected Content