गौण खनिज चोरीप्रकरणी सात दिवसात कारवाईची मागणी ; अन्यथा आंदोलन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यात गौण खनिजांच्या चोरी प्रकरणी सात दिवसात कारवाई न झाल्यास संविधान रक्षक दल भीम आर्मीतर्फे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा तहसीलदार यांना निवेदनावेळी देण्यात आला.

गौण खनिज चोरीच्या व बेकाद्याशीर वाहतुकीचे सातत्याने वाढत्या प्रकाऱ्यामुळे तालुक्यातील चुंचाळे ह्या छोट्याशा गावातील गायरान जमिनिवरीलच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अत्यंत चिंताजनक परिस्थिती बनलेली आहे. या गौण खनिज चोरांच्याविरोधात संविधान रक्षक दल भीम आर्मी महाराष्ट्र राज्यसचिव सुपडू सदानशिव यांनी जोरदार मोहीम उघडली असून, त्याचाच एक भाग म्हणून चुंचाळे येथील चोरीस गेलेल्या लाखो रुपयांच्या गौण खनिजाची चौकशी व संबधित व्यक्ती वरती योग्य ती कार्यवाही करणे बाबत  यावल  तहसीलदार महेश पवार यांना  लिखित निवेदन दिले आहे. पत्रकात सुपडू संदानशिव यांनी स्पष्टपणे आरोप करून मागणी केली आहे की , मागील चार ते पाच महिन्यात यावल तालुक्यातील (चुंचाळे गावाजवळील) गायरान येथून चोरीस गेलेले लाखो रुपयांचे गौण खनिज,हे कोणाच्या अनुमती द्वारे काढण्यात आले व त्या ठिकाणाहून कोणकोणत्या व्यक्तिंद्वारे गौण खनिज वाहतूक केलेली आहे ? याची संपूर्ण चौकशी करून सदरील प्रकरणातील व्यक्तीवर्ती कठोर शासन करण्यात यावे.

या निवेदनात राज्यसचिव सुपडू संदानशिव पुढे आपली शंका व्यक्त करताना म्हणाले की , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(१) नुसार गौण खनिज अधिनियम महाराष्ट्र जमिनीवर किंवा जमिनी खाली असलेल्या  खाणी, दगडाच्या खाणी,नाले, नदीपात्रे इत्यादी ठिकाणी सापडणाऱ्या खनिजावरील सरकारचा हक्क स्पष्टपणे राखून ठेवण्यात आला आहे.असे असताना देखील शासनाची परवानगी न घेता,हा सर्व गौण खनिज चोरीचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे, तरी ह्या चोरी प्रकरणी स्थानिक शासकीय अधिकारी व व्यक्तींचे काही साटेलोटे आहेत की काय ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सुपडू संदानशिव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) अन्वये अवैध खोदकाम व वाहतूक करण्यात येणाऱ्या, व्यक्ती व अधिकाऱ्यांवरती योग्य ती चौकशी करून कार्यवाही व गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करून , या बाबीचे गांभीर्य लक्षात घेता गायरान (चुंचाळे.ता यावल) येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करून सात दिवसाच्या आत कार्यवाही करावी , अन्यथा संविधान रक्षक दल (भीम आर्मी) या सामाजिक संघटनेच्या वतीने संवैधानिक पद्धतीने आंदोलन केले जाईल ,असा इशारा दिला आहे .

यावेळी निवेदन देताना संविधान रक्षक दल भीम आर्मी महाराष्ट्र अध्यक्ष रमाकांत तायडे, राज्य सचिव सुपडू संदानशिव, जळगाव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे, विक्रम प्रधान, डॉली वानखेडे, विकास वलकर, यावल तालुका अध्यक्ष सचिन वानखेडे, गौरव सोनवणे, विनोद भालेराव, शिवाजीराव गजरे, विनोद सोनवणे, राजू वानखेडे, सतीश अडकमोल, करण ठाकरे, नितीन घोडके, रोशन तडवी, प्रवीण सावळे व रतन सोनवणे  यांच्यासह असंख्य पदाधिकारी / कार्यकर्ते  उपस्थित होते.

 

Protected Content