पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचे काम केले – सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका

सांगली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । शरद पवार यांनी आयुष्यभर काड्या लावायचे काम केले आहे त्यामुळे त्यांचे नाव आडनाव बदलवून आगलावे ठेवावे अशी बोचरी टीका रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोट यांनी केली. ते सांगली येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

सांगलीतल्या अहिल्यादेवी यांच्या स्मारकाच्या वादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.  या स्मारकाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, त्याआधीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले. याबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांच, उभं आयुष्य त्यांचं आग लावण्यात गेलं, त्यामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला, ते कुठतरी आतां थांबलं पाहिजे. ते पुढे म्हणाले की,  एका घरात आग लावायची तिथलं झालं की दुसऱ्या घरात आग लावायला जायचं काम शरद पवार करतात असल्याची टीका केली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!