सत्ता गेल्याने भाजपची ‘मविआ’वर काळी नजर- नाना पटोलेंची टिका

भंडारा – लाईव्ह ट्रेंडस वृत्तसंस्था । भाजपाच्या हातातून राज्यातील सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर काळी नजर असल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. भाजपची काळी जादू चालनार नाही असाही टोला त्यांनी लगावला आहे.

नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या हातून महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर भाजपची काळी नजर महाविकास आघाडी सरकारवर आहे. मात्र भाजपची काळी जादू चालणार नसूनही सरकार ५ वर्ष चालणार असल्याच्या विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ते भंडाऱ्यात आयोजित सायकल परेड दरम्यान बोलत होते.

पुढे बोलतांना पटोले म्हणाले की, भाजपांचे पहाटे आलेलं सरकार हातून गेल्याने भाजपचे नेते तडफडत आहे.  आमची सत्तेत भागीदारी असून कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार काम करत आहे. याचा त्रास विरोधकांना होत असून त्यांची काळी नजर असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

दरेकरांवर कारवाई व्हावी- पटोले

बँकेचे नियम धाब्यावर बसवून मुंबई बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे दरेकरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबई बँकेत घोटाळा झाला असून लेखा परीक्षणामध्ये तसा अहवाल आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content